मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात बुधवारी इंधन दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे २.६९ रुपये तर डिझेलच्या किंमतीत २.३३ रुपये घसरण झाली आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा दर ७५.९९ रुपये प्रति लिटर व डिझेल ६५.९७ रुपये प्रति लिटरने विक्री केले जात आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत पेट्रोलची किंमत १ रुपये ६० पैशांनी कमी झाल्या आहेत. तर डिझेलची किंमत १.५० रुपयांनी कमी झाली आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर जैसे थेच आहेत. पेट्रोल ७५.९९ आणि डिझेल ६५.९७ रुपयांना मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या किंमतीमध्ये ५४ पैशांची कपात झाली आहे. प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या दरात घसरण होत असल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेल स्वस्त होत आहे.