मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात भोंगे, हनुमान चालीसा घडामोडीमागे खा. राणा आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन असून ते पैसा पुरवत असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
अमरावतीच्या खा. नवनीत राणांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप करीत राज्यात सध्या जे भोंगे प्रकरण किंवा हनुमान चालिसा निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. राज्यात १९९२ च्या दंगली, अंडरवर्ल्ड, पाकिस्तान, डी गँग कनेक्शन, आंतरराष्ट्रीय टोळ्या चे कनेक्शन होते. तसेच आता देखील १५ दिवसापासून जे काही घडतंय त्यातून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत असल्याचे खा. राऊत यांनी ट्वीट केले आहे.
सक्तवसुली संचालनालयाने २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी लकडावाला अटक केली होती. युसूफने बेकायदेशीर पद्धतीने कमावलेल्या कमाईचा काही भाग नवनीत राणांच्या अकाऊंटमध्ये असल्यचा पुरावा दिला आणि नंतरच राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमानभक्त झालं आहे. त्या भक्तीत इतके बुडाले की मुंबईत येऊन धिंगाणा घालू लागले. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. आता खा. नवनीत राणा यांना ईडी आता चहा कधी पाजणार आहे? भाजपा शांत असल्याचे खा. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हणाले आहेत