खा. अमोल कोल्हे यांनी शरद पवार साहेबांसोबत असल्याचे केले जाहीर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. परंतू आपण शरद पवारसाहेबां सोबत असल्याचे एका ट्विटवरून जाहीर केले आहे.

 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची  सुत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी आपल्याला सर्वांचा पाठींबा असल्याचा दावा केला. शपथविधीच्या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. परंतू आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचे त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “जब दिल और दिमाग में जंग हो, तो दिल की सुनो. शायत दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत”, अशा सूचक शब्दांत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

शपथविधीबाबत आपल्याला माहिती नव्हती, असा दावा अमोल कोल्हेंनी एका प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. “मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी काल एका वेगळ्या कामासाठी भेटायला गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Protected Content