मनाली वृत्तसंस्था । अभिनेते तथा भारतीय जनता पक्षाचे गुरदासपूरचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेता सनी देओल यांची नुकतीच मुंबईत खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर ते कुल्लू जिल्ह्यातील मनालीजवळील एका फार्महाऊसमध्ये ते विश्रांतीसाठी गेले होते. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देओल हे कोरोना पॉझिटिव्ह झाले असून हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी याला दुजोरा दिला आहे.
हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी म्हणाले की, सनी देओल आणि त्यांचे मित्र मुंबईला रवाना होण्याच्या विचारात होते, मात्र, मंगळवारी कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती अवस्थी यांनी दिली आहे.