रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खानापूर येथील कोरोनाबाधित सहा वर्षीय चिमुकलीचा दुसरा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज तिला घरी सोडण्यात आले. यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे, नोडल अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांची उपस्थिती होती.
गेल्या १० दिवसांपासून तालुक्यातील खानापूर येथील सहा वर्षीय चिमुकली कोरोना बाधित आढळून आली होती. येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर आज दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने तिला आज घरी सोडण्यात आले. दरम्यान पोझिटीव्ह मुलीवर नोडल अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी विशेष लक्ष दिल्याने आमची मुलगी कोरोनावर मात करू शकल्याची भावना तिचे आई-वडील व्यक्त करत होते. तसेच इतर ३५ जणचे रिपोर्ट निगीटीव्ह अल्याने त्यांना देखिल घरी सोडण्यात आले आहे.
रावेर शहरात १३ कंटरमेंट झोन
कोरोना पासुन बचावासाठी रावेर शहरात १३ कंटरमेंट झोन करण्यात आले आहे तर ग्रामीण भागात २७ कंटरमेंट झोन लावण्यात आले आहे.कोरोना पोझिटीव्ह रुग्णाची वाढतीसंख्या बघुन विलगीकरणासाठी पर्यायी व्यव्यस्था बघत असल्याचे तहसिलदार उषाराणी देवगुने यांनी सांगितले.