अखेर सिव्हीलमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी डीन निलंबीत

जळगाव प्रतिनिधी । सिव्हील हॉस्पीटलमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्यासह दोन असे तीन अधिकार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. असून अन्य कनिष्ठ कर्मचार्‍यांवर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. याचे आदेश आज देण्यात आले आहेत.

सिव्हील हॉस्पीटलमधील शौचालयात कोरोना बाधीत वृध्द महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली असून या प्रकरणी जनभावना तीव्र झालेली आहे. या संदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत कालच मिळाले होते. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे; सहाय्यक प्राध्यापक, डॉ. सुयोग चौधरी, डॉ. कल्पना घनकवार यांच्यासह तीन जणांना निलंबीत निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत. आज निलंबीत करण्यात आलेल्यांमध्ये तीन अधिकारीचा समावेश आहे. दरम्यान, अन्य कनिष्ठ कर्मचार्‍यांवर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.

Protected Content