खळबळजनक : धरणगावातील कोरोना बाधित वृद्ध महिलेचा मृत्यू

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोना पॉझिटीव्ह वृद्ध महिलेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, मयत महिला मागील चार दिवसांपासून व्हेंटीलेटरवर होती.

 

शहरातील नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती मागील शनिवारी रात्री उशिरा समोर आली होती. परंतू आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. मयत महिलेला १७ मे पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, कोरोना बाधित महिलेचा स्वॅब सँपल १३ तारखेला घेण्यात आला होता. प्रशासनाने संबंधित परिसर सील करत अत्यावश्यक सेवा वगळता येथे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी बंदी घातली आहे. धरणगावातील वृध्द महिलेवर जळगाव येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातील लोकांना आवश्यकतेनुसार क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, मयत महिलेवर शासकीय नियमाप्रमाणे अत्यंत काटेकोर पद्धतीने नियमांचे पालन करत अंत्यविधी केला जाणार आहे. परिस्थितीवर हरातील परिस्थितीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रांतधिकारी विनय गोसावी, सहा.पोलीस निरीक्षक पवन देसले,   शिवसेना गटनेते पप्पू भावे, तहसीलदार नितीनकुमार देवरे हे लक्ष ठेवून आहेत. धरणगावात कोरोना बाधील पहिल्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

Protected Content