Home Cities जळगाव खडके प्राथमिक विद्या मंदीरात शिवजयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा उत्साहात

खडके प्राथमिक विद्या मंदीरात शिवजयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा उत्साहात


khadke1

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खडके प्राथमिक विद्या मंदिरात शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यावेळी शिवरायांचे प्रतिमेस माल्यार्पण जेष्ठ शिक्षिका आशालता वाणी, संजय पाटिल आणि जिजाऊ वेशेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्वाती चौधरी यांनी व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शिवरायांबद्दल माहीती सांगितली. याप्रसंगी कुमारी साक्षी ढगे नाशिक हिचे यु-ट्युबवरील शिवरायांचे गाजलेले भाषण व अफजलखानाचा वध हे व्हिडिओ दाखवुन त्यावर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आली. अचुक उत्तर देणाऱ्या विद्यार्थांना बक्षिसे वाटप करणेत आली. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनिल पवार सरांनी केले.


Protected Content

Play sound