फैजपूर प्रतिनिधी | फैजपूर नगरीचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानाच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून खंडोबा देवस्थान साठी ४० लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे.अशी माहीती संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांच्यासोबत नागा गोविंददास महाराज, प्रा.जी.पी.पाटील सर व मुख्याध्यापक गणेश गुरव उपस्थित होते.
या निधिसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आले आहे.सोमवार दि.२७ सप्टेंबर रोजी संत निवास तसेच जलकुंभाचा भुमिपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्यात संत निवास भुमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील,जलकुंभ भूमिपूजन खासदार रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सतपंथ संस्थान गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामिनारायण गुरुकुल सावदा उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदास महाराज,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होणार आहे. तर जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,आ.राजूमामा भोळे,जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील,आ.लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत पाटील,आ.संजय सावकारे,माजी आमदार स्मिताताई वाघ,माजी आमदार रमेशदादा चौधरी,पं.स.सभापती पल्लवी चौधरी,जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्षा नयना चौधरी,मा.सभापती भरत महाजन, नरेंद्र नारखेडे, प्रांताधिकारी कैलास कडलग,डीवायएसपी कृणाल सोनवणे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, मध्य रेल्वेचे मुन्ना सिंग तोमर यांच्यासह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारीं इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.