अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या कारणावरून दिलेल्या लिंकच्या माध्यमातून एकाच्या बँक खात्यातून १ लाा २० हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल रघुनाथ पवार हे अमळनेर शहरातील शांता निवास शिरूड नाका वास्तव्याला आहे. मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी अनिल पवार हे घरी असतांना रात्री १२.२१ वाजता त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करून सांगितले की, तुमचे क्रेडीट कार्ड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंकवरून ॲप डाऊन लोड करून घ्या असे सांगितले. त्यानुसार, अनिल पवार यांनी दिलेल्या ॲप डाऊनलोड करून दिलेल्या सुचनेनुसार माहिती भरली. त्यानंतर ऑनलाईन बँकींग साठी गुगल पे वर जाण्यास सांगितले. त्यांनी युझर नेम आणि पासवर्ड विचारणा केल्यानंतर त्यांनी सर्व माहिती पुरविली असता त्यांच्या खात्यातून थेअ १ लाख २० हजार रूपये पैसे कमी झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.