क्रिप्टो करन्सीत पुन्हा तेजी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गुंतवणूकदार पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीकडे वळल्याने भाव वधारल्याचं बोललं जात आहे. सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटक्वाइनची किंमत ५०,१५२.२४ डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.

 

झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून अनेकांनी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याकडे धाव घेतली होती. बिटक्वाइनचे बाजार भांडवल ९४३ अब्ज डॉलर्स इतकं आहे. १ ट्रिलियन डॉलर्सच्या जवळ आहे. मात्र अनेक देशांनी बिटक्वाइनवर बंधनं लादल्यानंतर क्रिप्टो करन्सीचं चमक गेल्या काही महिन्यात कमी झाली होती. मात्र आता तीन महिन्यानंतर बिटक्वाइनचा क्वाइनडेस्कवर रेट ५० हजाराच्या वर सुरु आहे. गेल्या तीन महिन्यात क्रिप्टो करन्सीत २.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

एप्रिल महिन्यात क्रिप्टो करन्सीमध्ये विक्रमी घसरण झाली होती. बिटक्वाइन ६५ हजार डॉलरवरून ३० आणि ४० हजार डॉलर्सपर्यंत घसरण झाली होती. मात्र आता बिटक्वाइनमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे. पुढील काही दिवस क्रिप्टो करन्सीचा भाव आणखी वधरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये चढ-उतार सामान्य आहे. त्यामुळे अचानक झालेली वाढ पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगायला हवी, असं मतही जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.

 

Protected Content