जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महापालिकेतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या सेन्ट्रल फुले मार्केट मधील ज्योतीबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
सेन्ट्रल फुले मार्केटमधील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले याच्या अर्धकृती पुतळ्यास महापौर जयश्री महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेविका सरिता नेरकर, अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त श्याम गोसावी. शहर अभियंता व्ही. ओ. सोनवणी, कार्यालय अधिक्षक चंद्रकांत वांद्रे, तसेच मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.