कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये जेवण मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला कानात मारल्याने दुखापत केली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात बुधवार २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कांचन नगर भागात गणेश पुंडलिक ठाकरे व पौर्णिमा गणेश ठाकरे हे पती-पत्नी वास्तव्याला आहे. १३ ऑक्टोबर रात्री ११.३० वाजता गणेश पुंडलिक ठाकरे यांनी जेवण मागितल्याच्या कारणावरून त्यांच्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात रागाच्या भरात गणेश पुंडलिक ठाकरे यांनी पत्नी पौर्णिमा ठाकरे यांच्या कानावर मारून दुखापत केली. याबाबत विवाहितेने बुधवार २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती गणेश पुंडलिक ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत देशमुख करीत आहे.

 

Protected Content