कोविन अॅपमधील त्रुटींची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे तक्रार

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोविन लसीकरण अॅपवर  अनेकदा नोंदणी होत नाही  नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळत. नाही   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवं अॅप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.

 

लसींचा अपुरा पुरवठा आणि कोविन अॅप हाताळताना येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक वैतागले आहेत. अनेक ठिकाणी नोंदणी असूनही लस नसल्याने माघारी परतावं लागत आहे. काही ठिकाणी सर्वर डाऊन असल्यामुळेही गोंधळ उडाला आहे.

 

‘लस न घेताही लस मिळाल्याचा मॅसेज येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गोंधळ टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस मिळेल यासाठी ४ अंकी सुरक्षा कोड आणला आहे. आजपासून हा ४ अंकी सुरक्षा कोड लागू झाला आहे. लसीकरणाच्या स्लॉटसाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांनाच हे नवे फिचर लागू होईल.

 

देशात अवघ्या २४ तासांत कालावधीत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक  रुग्ण आढळून आले आहेत. देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील असा भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका डोकं वर काढताना दिसत आहे.

Protected Content