फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरस संरक्षणासाठी फैजपूर भाजपा शहर अध्यक्ष अनंता नेहेते यांच्या हस्ते धोबी वाड्यातील मोठा मारुती हनुमान मंदिरात साकडे टाकून पूजा करण्यात आली.
कोरोना व्हायरस संरक्षणासाठी फ़ैजपूर येथील धोबी वाड्यातील हनुमान मंदिरात शुक्रवारी सकाळी १० वाजता हनुमान चालीसा वाचून, आरती, हार, श्रीफळ वाहून साकडे टाकण्यात आले. यावेळी प्रभाकर माहूरकर, चंद्रशेखर चौधरी, विलास काठोके, नितीन बोरोले, दिपक होले, किरण बोरोले, चंद्रकांत सोनवणे, गोपाल अग्रवाल, विकी सोनवणे, संतोष सोनवणे उपस्थित होते.