कोरोना संदर्भातील तक्रारी वाॅररूमला कळविण्याचे आवाहन !

 

जळगाव (प्रतिनिधी) कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे वॉररुम स्थापन करण्यात आलेली आहे.
कोव्हिड-19 संबंधित काही तक्रार/अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 वर संपर्क करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

तसेच ई पास संबंधित काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक 2217193 यावर संपर्क न करता 2222750 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा. तसेच वॉर रुममध्ये नव्याने दुरध्वनी क्रमांक 2220500 हा वाढविण्यात आल्याने कोव्हिड-19 संबंधित काही तक्रारी/अडचण असल्यास वॉर रुममधील टोल फ्री क्रमांक 1077, 2217193 व 2220500 वर संपर्क साधण्यात यावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content