कोरोना: संग्रामपुर नगरपंचायतर्फे खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन कार्यशाळा

संग्रामपूर प्रतिनिधी । संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संग्रामपुर परिसरात येणाऱ्या रुग्णावर लक्ष ठेऊन त्याची माहिती संबंधित आरोग्य व नगर पंचायत प्रशासनाला देण्यासाठी आज संग्रामपुर नगरपंचायतीच्या वतीने खाजगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.

राज्यात कोरोना विषाणूची लागण होत आहे. अशातच मुंबई, पुणे सारख्या शहरात आता या विषाणुचा फैलाव वाढत आहे. संग्रामपुर व परिसरातही अनेकांना सर्दी ताप खोकला असे आजार दिसून येत आहेत. यासाठी संग्रामपुर नगरपंचायततर्फे खासगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कोरोना संबंधी घ्यावायाची काळजी, शासकीय यंत्रणेला करावयाची मदत, अशा अनेक बाबींबाबत चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य निरीक्षक श्री नागापुरे यानी शहरातील खाजगी आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. यावेळी शहरातील सर्वच खाजगी डॉक्टर्स उपस्थित होते.

Protected Content