कोरोना विषाणू मानव निर्मितच ; नॉर्वे व ब्रिटनच्या शास्त्रज्ञांचा दावा

लंडन (वृत्तसंस्था) निसर्गामध्ये याआधी कधीही आढळली नव्हती अशी वैशिष्ट्ये कोविड-१९ या विषाणूमध्ये सापडली आहेत. अगदी माणसाला संसर्ग व्हावा अशीच कोरोना विषाणूची रचना आहे. त्यामुळे कोविड-१९ विषाणू मानवनिर्मित आहे, असा ठाम दावा नॉर्वे व ब्रिटनच्या विषाणूतज्ज्ञांनी केला आहे.

 

नॉर्वे व ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, प्राण्यातून माणसामध्ये विषाणूने प्रवेश केला तर त्या विषाणूच्या डीएनए, आरएनएमध्ये फरक पडतो; पण तसा काही बदल कोविड-१९ विषाणूमध्ये आढळून आलेला नाही. याचा अर्थ हा विषाणू प्राण्यातून माणसांमध्ये संक्रमित झालेला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे कोरोनाची महाभयंकर साथ ज्याच्यामुळे उद्भवली तो कोविड-१९ विषाणू मानवनिर्मित आहे, असा ठाम निष्कर्ष नॉर्वे व ब्रिटनच्या विषाणूतज्ज्ञांनी यासंदर्भातील अभ्यासातून काढला आहे.

Protected Content