कोरोना: विदर्भात मुंबई-पुण्याहून आलेले १०० जण कोरोनाग्रस्त आढळले

नागपूर वृत्तसंस्था । राज्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरातील अनेकजण गावी जात आहेत. नागरीक गावी जात असल्याने गावाकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई-पुण्यातून विदर्भात आलेल्यांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. विदर्भात मुंबई-पुण्यावरुन आलेल्या १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात १७ कोरोना रुग्णांपैकी १५ रुग्ण हे मुंबई, पुण्यावरुन आलेले प्रवाशी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २३ रुग्ण आहेत. हे २३ रुग्ण मुंबई, पुण्यावरुन आलेले प्रवाशी आहेत. ग्रीन झोन असलेलल्या जिल्ह्यात मुंबई, पुण्यातील नागरिक आल्यामुळे तेथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागपुरातही चार दिवसांत मुंबईवरुन आलेले चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर गोंदियातील बहुतांश रुग्णांना पुणे, मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या १०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५४ हजार ७५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १७९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १६ हजार ९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ३६ हजार ००४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Protected Content