कोरोना लस नोंदणीसाठी Co-WIN अ‍ॅप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरकारने कोविड व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी एक अ‍ॅप विकसित केलं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे . लसीकरणाच्या सर्व प्रक्रीयेवर या अ‍ॅपद्वारे नजर ठेवली जाईल. Co-WIN असं या अ‍ॅपचं नाव आहे.

Co-WIN हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. पण, अद्याप हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध झालेलं नाही.

कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सिनची जगातील अनेक देश अंतिम चाचणी घेत आहेत. या यादीमध्ये भारताचंही नाव आहे. देशातील तीन कंपन्यांनी आपल्या कोरोनी व्हॅक्सिनचा आपात्कालीन परिस्थीतीत वापर करण्याची परवानगी मागितली आहे. अशात, भारतातही लवकरच लसीकरणाला सुरूवात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाला केव्हा सुरूवात होईल याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण लसीसाठी रजिस्ट्रेशन करता यावं यासाठी सरकारने एक अ‍ॅप डेव्हलप केल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

आरोग्य मंत्रालयाकडून या अ‍ॅपबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, Co-WIN अ‍ॅप सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय यामध्ये लसीकरणाच्या प्रक्रीयेपासून प्रशासकीय कामं, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि लस घेणाऱ्या नागरीकांची माहिती अशाप्रकारचा सर्व डेटा स्टोअर केलेला असेल. या अ‍ॅपमध्ये सेल्फ-रजिस्ट्रेशनचाही पर्याय मिळेल.

कोरोनाची लस नागरीकांना तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचारी आणि नंतर वयोवृद्ध व्यक्ती तसंच गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. पण लसीकरणासाठी या सर्वांचं Co-WIN अ‍ॅपवरच रजिस्ट्रेशन होईल. याशिवाय तुम्हाला स्वतःला लस घ्यायची असल्यास तुम्ही यात सेल्फ रजिस्ट्रेशनही करु शकतात.

 

Protected Content