कोरोना रुग्ण शोधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पथके कार्यरत

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णशोध मोहीम हाती घेतली आहे. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व परिवारातील संस्था मोहिमेत सर्वेक्षण करीत आहेत.

रुग्णशोध मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तापमापक यंत्राने ताप मोजणे, ऑक्सिमिटर च्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी, पल्स रेट मोजणे, तसेच इतर आजार (मधुमेह, T.B. , हृदयरोग इ.) ची नोंद केली जात आहे. एका टीममध्ये एक महापालिका शिक्षक व दोन स्वयंसेवक असे तीन जण आहेत. या प्रमाणे शहरातील ५० भागांत १००+ स्वयंसेवक सर्वेक्षण करीत आहेत. प्रत्येक टीम रोज १०० घरांचे सर्वेक्षण करणार आहे. स्वयंसेवकांच्या सुरक्षेसाठी त्यांना PPE kit, फेसशील्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन तपासणी केल्यावर आपण आपल्यापरीने मानवी संक्रमणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आनंद होतो, असे स्वयंसेवकांच्या अनुभवातून समोर आले.

Protected Content