बेंडाळे महीला महाविद्यालयात संवाद कौशल्ये कार्यशाळा संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महीला महाविद्यालयातील फिनिशिंग स्कूल तर्फे तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी संवाद कौशल्ये कार्यशाळा घेण्यात आली. तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये आत्मविश्वासपूर्ण संवाद साधण्याच्या पद्धती, संवादकला उत्तम करण्यासाठी आवश्यक बाबी इत्यादींचे मार्गदर्शन करण्यात आले.

 

महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ..सत्यजित साळवे यांनी नगरी मराठीमध्ये संवाद साधतांना घ्यावयाची काळजी यावर विशेषत्वाने भर दिला. हिंदी संभाषण चातुर्य मिळविण्यासाठी भाषेचे योग्य ज्ञान आवश्यक असते, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय रणखांबे यांनी केले. इंग्रजीचा बाऊ न करता तिला आपले मित्र करा, असे महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील डॉ. नंदनवार यांनी सांगितले.

 

विद्यार्थीनींना भविष्यात प्रगती करायची असेल तर सुयोग्य संवाद चातुर्य येणे गरजेचे आहे. हे विचार आपल्या प्रास्ताविकातून फिनिशिंग स्कूलचे समन्वयक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मांडले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनात डॉ. शीला राजपूत, प्रा. निलेश कोळी, डॉ. मोनाली खाचणे, डॉ. Rupali चौधरी, प्रा. सायली पाटील, डॉ. विनोद नन्नवरे, प्रा. सुचित्रा लोंढे यांनी कार्य केले. आभार प्रा. निलेश कोळी यांनी मानले.

Protected Content