कोरोना : रानू मंडल आर्थिक विवंचनेत

 

मुंबई : वृत्तसंस्था । एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

कोरोना संकटाचा सामना साऱ्यांनाच करावा लागत आहे. परिणाम उद्योग, व्यवसायावरही झाला आहे. कित्येक दिवसांपासून त्यांना मुंबईत काम मिळत नसून स्टेज शो किंवा गाण्याचे कार्यक्रमदेखील त्यांना मिळत नाहीत.
‘राणाघाट की लता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रानू यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचं राहतं जुनं घर सोडून दिलं होतं. त्या नव्या घरात राहायला गेल्या होत्या. मात्र आर्थिक संकट कोसळल्यामुळे त्या पुन्हा त्यांच्या जुन्या घरी परतल्या आहेत.

Protected Content