Home Cities धरणगाव कोरोना : माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धरणगाव पोलीसात एकावर गुन्हा

कोरोना : माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धरणगाव पोलीसात एकावर गुन्हा


धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील प्रिंपी येथे कोराना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे भावाकडे राहत असल्याबाबत पोलीसी पाटील यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने तरूणाच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पिंप्री येथील पोलीस पाटील गोपाल बडगुजर यांनी कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने गावातील भोई गल्लीतील संदीप मंगळ भोई (वय-३४) हा घराबाहेर फिरतांना आढळून आला. संदीप भोई हा अमळनेर येथील आपल्या भावाकडे राहत होता याबाबत पोलीस पाटील यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान तरूणाला ताब्यात घेतले असून त्यांला अमळनेर येथे रवाना केले आहे.


Protected Content

Play sound