पिंपरी (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड परिसरात या आदेशाला न जुमानत अनेकांनी आपली दुकाने उघडली होती. या प्रकरणी दोन दिवसात एकूण १९३ दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.\
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच, यापूर्वीही सर्व अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरात या आदेशाला न जुमानत अनेकांनी आपली दुकाने उघडली होती. या प्रकरणी काल दिवसभरात तब्बल ९८ तर दोन दिवसात एकूण १९३ दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत.