पारोळा, प्रतिनिधी । राज्यात कोरोनाचा जोर वाढत आहे.त्याने आता सर्वदूर पाय पसरण्यास सुरवात केली आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात देखील तो पाय पसरवीत आहे. त्याला रोखण्यासाठी १ ते ३ मे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवहान आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कृषी उत्पन्न समितीने देखील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.
आ. चिमणराव पाटील यांच्या तीन दिवशीय जनता कर्फ्यू पाळण्याच्या आवाहनास प्रतिसाद देत पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती देखील जनता कर्फ़्युत सहभागी झाले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पारोळ्याचा उद्या रविवार दि. ३ मे रोजी आठवडे बाजार आहे. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेही लिलाव हे होणार नाहीत. संपूर्ण व्यवहार हे रविवारी देखील बंदच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला कोणताही शेतमाल विक्रीला आणू नये याची शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सभापती अमोल पाटील, संचालक मंडळ यांनी केले आहे.