कोरोना : ‘त्या’ व्यक्तीच्या नातेवाईकांना केले क्वारंटाईनं

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी । येथील जावई व नाशिक येथे राहत असणाऱ्या व्यक्तीचा कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेंदुर्णी, वलवाडी येथे येऊन गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या संपर्कातील १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, शेंदूर्णी येथील जावई आणि सद्या नाशिक येथे राहत असलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आलेले होते. त्या व्यक्तीची स्वॅब तपासणी अहवालाची प्रतीक्षा होती. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती २४ व २५ एप्रिल रोजी शेंदूर्णी ,वलवाडी येथे येऊन गेलेली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या संपर्कातील सासरच्या १० व्यक्तींचा स्वॅब तपासणी नमुने घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पहुर येथे पाठविण्यात आले आहे. स्वॅबनमुने घेतल्यावर हाय रिस्क ग्रुप मधील सर्वच्या सर्व १० लोकांना शेंदूर्णी येथिल गरुड महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नातेवाईक राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे.

Protected Content