जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मोलमजूरी करणारे मजूर गावाकडे पायी निघाले आहे. अश्यांना रविवारी दुपारी जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली.
गेल्या आठवड्यापासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे बाहेरगावी कामाच्या निमित्ताने गेलेले मजूर आता गावाकडे परतत आहे. वाहनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी पायदळ करणे पसंत केले आहे. ते भरूच ते आकोला अशी त्यांची यात्रा होती. शनिवारी पहाटे ५० ते ६० जण जळगाव येथे दाखल झाल्यानंतर सर्वांना जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात त्यांच्या जेवनाची व राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात तपासणी केली. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून त्यासर्व नागरिकांची अकोला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देणार आहे. यावेळी प्रभू सोनवणे सोबत होते.