कोरोना : जिल्ह्यात नव्याने १२२ कोरोना रूग्णांची भर; ३३८ रूग्ण झाले बरे !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने गुरुवारी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १२२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ३३८ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज धरणगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-३८, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-७, अमळनेर-५, चोपडा-१६, पाचोरा-१८, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-६, जामनेर-६, रावेर-०, पारोळा-२, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार १०४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४६ हजार ७५० बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content