जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने गुरुवारी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १६० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर २८१ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-३४, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-२४, अमळनेर-४, चोपडा-२४, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-६, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-२८, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१३, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १६० बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ९८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४६ हजार ४१२ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.