जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतेच विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा शपथविधी करण्यात आला.
ज्यामध्ये शाळेच्या कॅप्टन, उपकॅप्टन, हाऊस कॅप्टन आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश होता. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी आणि युवा सर्विस (राजपत्रि अधिकारी) श्री. राजेंद्र नाईक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच स्कूलच्या प्राचार्या सौ. निलीमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमादरम्यान नव्याने निवडलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे मूल्य आणि तत्त्वे जपत आपल्या जबाबदार्या पार पाडण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदारीची महत्त्वपूर्णता सांगत त्यांना त्यांच्या कर्तव्याबद्दल जागरूक केले. शाळेच्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना उत्तम मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.या समारंभात विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सहभाग घेतला आणि आपल्या मुलांच्या नेतृत्वगुणांचा अभिमान व्यक्त केला.
शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास सर्व शिक्षकांनी व्यक्त केला.हा कार्यक्रम विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांसाठी जबाबदारी आणि नेतृत्वाच्या प्रवासाची सुरुवात करतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा सर्वांगीण विकास सुनिश्चित होईल.