जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात चार संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात चाळीसगाव व अमळनेर वगळता इतर सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात अमळनेर तालुक्यातून १ तर चाळीसगाव तालुक्यातून ३ बाधित रूग्ण असे एकुण ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात एकुण ४ रूग्ण कोरोना आजारातून बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७७ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.