जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज शहरासह ११ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर- ०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ- १, अमळनेर-२, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल- ०, एरंडोल -०, जामनेर- १, रावेर – ०, पारोळा -०, चाळीसगाव- २, मुक्ताईनगर-०, बोदवड -०, इतर जिल्हे ० असे एकुण ६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४७५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ६ ६४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २३७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज १ १ तालुका निरंक आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.