जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आजच्या अहवालात जळगाव शहरातील दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर चार तालुके निरंक असल्याचे आढळून आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१५, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-३, अमळनेर-३, चोपडा-२, पाचोरा-१, भडगाव-२, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-२ असे एकुण ३८ बाधित रूग्ण आढळले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालाप्रमाणे जिल्ह्यात एकुण ५५ हजार ७१५ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५३ हजार ९९८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ३९२ रूग्णांवर उपचार घेत आहे.