कोरोना : जिल्ह्यात आज २९ रूग्ण बाधित आढळले; ४४ रूग्ण झाले बरे !

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयात पाठविलेल्या कोरोना अहवालात आज २९ बाधित रूग्ण आढळले आहे. तर ४४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सात तालुके निरंक आढळून आले आहेत.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-९, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-७, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-२, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण २९ बाधित रूग्ण आढळले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५५ हजार ९५० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार १७७ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. तर ४४४ बाधित रूग्ण विविध कोरोना रूग्णालयात उपचार घेत आहे. आज सुदैवाने एकाची रूग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात एकुण १ हजार ३२९ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Protected Content