कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने ३७४ रूग्ण आढळले ; ४६८ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने दिलेल्या अहवालात आज दिवसभरात ३७४ कोरोना बाधित नव्याने आढळून आले आहे, तर ४६८ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर-४१, जळगाव ग्रामीण -१६, भुसावळत-४५, अमळनेर-४३, चोपडा-७९, पाचोरा-१५, भडगाव-१५, धरणगाव-०, यावल-३१, एरंडोल-१, जामनेर-८, रावेर-१०, पारोळा-६, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण ३७४ रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ७११ कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४३ हजार ६५९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ४६७ कोरोना रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ हजार ५८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content