जुन्या गावात खुल्या भूखंडावरील अतिक्रमण काढले (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जुन्या गावातील श्रीराम मंदिर जवळील धोबी वाड्यातील महापालिकेच्या खुल्या भूखंडावरील पक्के बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.

 

जुन्या गावात धोबी वाड्यातील महापालिका मालकीच्या खुल्या भूखंडावर पक्के बांधकाम करण्यात आले होते. याविरोधात विजय नारखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यासोबतच त्यांनी मागील ३ ते ४ वर्षापासून महापालिकेच्या लोकशाही दिनी अर्ज दाखल करून मनपा मालकीच्या जागेवरील घर ताब्यात घेऊन त्या भूखंडाचा विकास करावा अशी मागणी केली होती. यानुसार अतिक्रमण विभागाने बांधकाम विभागाचा अभिप्राय मागविला होता. बांधकाम विभागाने हे २ रूम, संडास, बाथरूम असलेले घर काढून टाकण्याची सूचना दिल्या होत्या. यानंतर आज अतिक्रमण विभागातर्फे हे घर जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, इस्माईल भिस्ती आदींच्या पथकाने केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/915648545812645

 

Protected Content