जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस होत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या जिल्हा आरोग्य सेवा समन्यय समितीच्या बैठकीचे आयोजन ११ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन भवनात करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती राहणार आहे.
यांची उपस्थिती राहणार
जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, महापौर भारती सोनवणे, खा. उन्मेश पाटील, खा.रक्षा खडसे, आ. किशोर पाटील, माजी मंत्री आ. शिरीष चौधरी, आ. लताबाई सोनवणे, आ. संजय सावकारे यांच्यासह खासगी क्षेत्रातील १० नामवंत डॉक्टरर्स, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जि.प. कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, विद्यूत मंडळाचे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दोन अशासकीय संस्था, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पवन पाटील, जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोतोड यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.