जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजपूत समाजासाठी आर्थि विकास महामंडळाची स्थापन केल्याच्या निर्णयाबाबत राजपूत समाजाचे अभियंता दिपकसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे दौऱ्यावर असतांना त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर असतांना, राजपूत समाजाचे युवा नेते अभियंता दिपकसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तथा राजपूत समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी विर शिरोमनी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा मंत्रिमंडळात क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले व शाल देऊन सत्कार केला. राजपूत समाजाच्या उर्वरित मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली. याप्रसंगी आ. किशोरअप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, समाजसेविका इंदुताई राजपूत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.