जळगाव (प्रतिनिधी) देशभरात ‘कोव्हिड -19’ मुळे दि.२२ मार्चपासून ‘लॉकडाऊन सुरू झाले आहे. याकाळामध्ये सगळे व्यवहार ठप्प झाले. तसेच व्यापारी बांधवांना उत्पन्नाचा आपली दुकाने पूर्णतः बंद ठेवावी लागल्याने उत्पन्नचा स्रोत गेला. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे भाडे आणि कर माफ करावे, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशनतर्फे मनपा महापौर व आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांना आपल्या आस्थापना बंद ठेवाव्या लागल्या होत्या. गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही सवलत मिळाली असली तरी अजूनही जळगावात शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने शासकीय आदेशानुसार बंदच आहेत. व्यापाऱ्यांना प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. जळगाव शहरातील व्यापारी बांधवांवरील आर्थिक संकट लक्षात घेऊन भाडे माफ करण्याचा ठराव मंजूट करण्यासाठी विशेष बैठक बोलवावी व भाडे माफ करावे अशी विनंती जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललीत बरडीया यांनी याबाबत निवेदन महापौर सौ.भारती सोनवणे व आयुक्त सतिष कुलकर्णी यांना दिले आहे.