मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठीच्या राज्यातील एमपीएसीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.
मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात 9 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कस्तुरबा गांधी रुग्णालयाची भेट घेतली आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोपे म्हणाले की, राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.