‘आयएमए’चा आज व्हाइट अलर्ट; हल्ले रोखण्यासाठी कायदा लागू करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोना झालेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्काराला झालेला विरोध, डॉक्टरांवर होणारे हल्ले यांचा निषेध करण्यााठी आयएमएतर्फे २२ एप्रिल रोजी देशभरात रात्री ९ वाजता प्रत्येक डॉक्टर एक मेणबत्ती पेटवून व्हाइट अलर्ट देणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिली आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणार्‍या, आयएमएचे सदस्य असलेल्या डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी या डॉक्टरांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारात तेथील स्थानिक लोकांनी अडथळा निर्माण केला. अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्टरांच्या शोकाकुल परिवारावर अमानुष हल्ला केला गेला. सरकारी यंत्रणा हे वर्तन रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत झाली आहे. कोरोनाच्या साथीची भयावह राष्ट्रीय आपत्तीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची तमा न बाळगणार्‍या डॉक्टरांवर आज अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. या घटनांचा निषेध म्हणून तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचार विरोधी केंद्रीय कायदा व्हावा या मागणीसाठी आयएमएतर्फे २२ एप्रिल रोजी राष्ट्राला व्हाइट अलर्ट येणार आहे. या निमित्ताने रात्री ९ वाजता आयएमएचे सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये प्रत्येकी एक मेणबत्ती पेटवणार आहेत.

दरम्यान, व्हाइट अ‍ॅलर्टनंतरही डॉक्टर आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार कायदा करण्यास सरकार अपयशी ठरल्यास २३ रोजी काळा दिवस पाळणार असून काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार आहेत. यात जळगाव शहरातील ६०० डॉक्टरांसह १२०० डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आयएमएचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content