कोरोना एक व्हायरस नव्हे तर अमेरिकेवर हल्ला झालाय : डोनाल्ड ट्रम्प

वॉश्गिंटन (वृत्तसंस्था) जगातील सर्वाधिक चांगली अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. चीनपेक्षा उत्तम आहे. मागील ३ वर्षात आम्ही मेहनतीने हे सर्व उभे केले आहे आणि अचानक हा व्हायरस येतो अन् सर्व बंद करायला भाग पाडतो. कोरोना हा फक्त फ्ल्यू नाही. हा अमेरिकेवर हल्ला झालाय, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही संकटात अडकला आहे. या व्हायरसवरुन अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाबाबत बोलताना सांगितले की, हा त्यांच्या देशावर हल्ला झाला आहे. हा एक हल्ला आहे. फक्त फ्ल्यू नाही. आजपर्यंत कोणी असे पाहिले नाही. १९१७ मध्ये असं घडलं होतं असे ते म्हणाले.

 

आम्ही आमच्या एअरलाइन्सला वाचवलं. अनेक कंपन्यांना मदत केली. या कंपन्यांचे कामकाज गेल्या दोन महिन्यापासून चांगल्यारितीने सुरु होतं. मात्र अचानक या संकटामुळे त्या बाजाराच्या बाहेर फेकल्या गेल्या. सध्या देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात घट होत आहे. अमेरिकेत ४७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ८ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने आम्ही यातून उभारी घेऊ, असंही ट्रम्प यांनी सांगितले.

Protected Content