केंद्राचे राज्यांना ‘काळ्या बुरशी’चा साथीच्या कायद्यांर्गत समावेश करण्याचे निर्देश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था  ।  केंद्राने कोरोना काळात समोर आलेल्या  काळी बुरशी, ब्लॅक फंगस  किंवा म्युकरमायकोसिस अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा साथीच्या कायद्यांर्गत समावेश करावा असे निर्देश राज्यांना दिले आहेत. 

‘काळ्या बुरशी’ला साथीच्या कायद्यांतर्गत अधिसूचित करून त्यानुसार सर्व प्रकरणांची नोंद करण्याची गरज केंद्रानं व्यक्त केलीय. त्यामुळे, काळ्या बुरशीची पुष्टी झालेल्या तसंच संशयित रुग्णांची माहिती आरोग्य मंत्रालयाला दिली जाणार आहे. ‘सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये तसंच वैद्यकीय महाविद्यालयांनी काळ्या बुरशीची तपासणी, निदान आणि व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणं गरजेचं आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्यांना लिहिलेला पत्रात म्हटलंय.

‘काळ्या बुरशी’त करोना विषाणूनं बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं समोर आलंय. उल्लेखनीय म्हणजे, केवळ महाराष्ट्र राज्यात एव्हाना काळ्या बुरशीची तब्बल १५०० प्रकरणं समोर आली आहेत तर यामुळे जवळपास ९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तामिळनाडूमध्येही काळ्या बरशीचे नऊ रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये काळ्या बुरशीला सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत नोटिफाय करण्यात आलंय.

Protected Content