कोरोनासाठी नाकातून नव्हे तर तोंडातून सँपल घेणे सोयीचे !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतांना आता याच्या चाचणीबाबत नवीन दावा करण्यात आला असून यात तोंडातील लाळेच्या माध्यमातून कोविडचे संक्रमण अधिक अचूकपणे करता येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

कोरोना महामारीत शरीरातील विषाणू शोधण्यासाठी नाकाचा वापर केला जातोय. आरोग्य कर्मचारी आजवर नाकात स्वॅब स्टिक टाकून नमुने घेत आहेत. पण आता ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्‍वभूमिवर विषाणू शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नाक नाही तर तोंड असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे रिसर्चर डॉ. डोनाल्ड मिल्टन यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, कोरोना व्हायरस सर्वात पहिले तोंड आणि घशात आढळतो. याचा अर्थ आपण आतापर्यंत ज्या कोरोना टेस्ट मेथडचा वापर करत होतो. त्यामध्ये अनेक समस्या आहेत. काही शोधांनुसार, नाकाऐवजी तोंडाच्या लाळने व्हायरसचा शोध प्रारंभीच्या दिवसातच करणे शक्य आहे.

डॉ. मिल्टन आणि त्यांच्या टीमने कोरोना टेस्टची चांगली मेथड ओळखण्यासाठी एक रिसर्च केला. यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणे येण्यापूर्ीच त्यांच्या नाक आणि तोंडाचे सँपल घेण्यात आले. रिसर्चनुसार, नाकाच्या तुलनेत तोंडात तीन पटींनी जास्त व्हायरस आढळतो. यासोबतच तोंडातून घेतलेल्या सँपलने जास्त कोरोना पॉझिटिव्ह रिजल्ट दिले. हे नाकाच्या तुलनेत १२ पटींनी जास्त होते. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने नुकतेच काही सलाइवा-बेस्ड कोरोना टेस्ट किट्सला मंजूरी दिली आहे. हे शाळेत मुलांची कोरोना चाचणी करण्याच्यासाठी कामी येत. मात्र अजुनही जगभरात नाकातूनच स्वॅब घेतले जात आहेत.

Protected Content