पारोळा प्रतिनिधी । सद्या जगभरात कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी देशात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याने बहुतांश शहरे व तालुक्यात नियंत्रण ठेवण्यात आजपर्यंत यश आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन दर्पण समुहाचे अध्यक्ष विजय नावरकर यांनी केले आहे.
पारोळा तालुक्याच्या आराध्य ग्रामदैवत प्रभु श्री बालाजी महाराजाच्या पुण्य पावण स्पर्शाने व जनतेच्या सहकार्याने पुढील येणारा काळही चांगला निरोगी जावो हीच प्रार्थना आहे. देशांमध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी २५ टक्के नोकर वर्गावर काम केले जात असल्याने संपूर्ण अर्थ चक्र हे मंदावले असून त्यात कोरोनाच्या संसर्गाने उद्योग व्यवसायात नोकरदार वर्गावर उपासमारीची वेळ आल्याने मोठमोठ्या शहरांमधून उर्वरीत नोकर वर्ग हा मिळेल त्या वाहनाने पायी सांयकलीने आपल्या गावांकडची वाट धरली आहे.
गावात नवीन येणाऱ्यांना आवाहन
आज गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या गांवी प्रवेश करण्याआधी आपल्या जिल्हा, तालुका आरोग्य विभागात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. मगच आपल्या गावांत घरी जावे, कारण तुम्ही ज्या मोठ्या शहरांतुन प्रवास करून येत आहात त्यात तुम्हांला होणाऱ्या त्रासाने ज्या गावात घरात कोरोनाची लागणं नाही त्याठिकाणी लागणं होऊ शकते. आपल्या एका छोट्यांशा चुकि मुळे परिवाराला व गावाला या आजराशी लढावे लागेल व जन जीवण विस्कळीत होईल त्यामुळे सर्वांनी तपासणी करून काळजी घेऊनच घरी जावे व घरी आल्यानंतर आपल्या परिवाराची, गावाच्या व आपल्या स्वताःच्या दक्षतेसाठी आपण घरात एका खोलीत १४ दिवस क्वारंटाईन करून घरात कोणाशीही जवळ जाऊन बोलु नये. त्यामुळे आपण व आपला परिवारही सुरक्षित राहील यांची सर्वानी काळजी घ्यावी. अमळनेर, पारनेर, अशी अनेक गावात असेच घडले आहे.
नागरीकांना आवाहन
आपल्या गावात नवीन कोणी व्यक्ती आला असेल तर त्याला तपासणीसाठी करूनच घरी पाठवायचे. तसेच तालुका पोलीस स्टेशन, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांना तपासणी केल्याची व गावात आल्याची माहिती द्या. या आजारावर जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत आपण महत्वाच्या कामाशिवाय बाहेरगावी जाऊ किंवा येऊ नये असे आवाहन दर्पण समुहाचे अध्यक्ष विजय नावरकर यांनी केले आहे.