कोरोनावर ” ब्रम्हास्त्र” वरदान ठरेल : सोलंकी यांचा दावा

जळगाव , प्रतिनिधी । सध्या कोरोना या महारोगाने थैमान घातलंय , त्याला थांबवण्याची ताकद फक्त भारतीय आयुर्वेदात आहे. २० वर्षे औषधी निर्मिती क्षेत्रात अनुभव असलेले किशोरसिंग सोलंकी यांनी दावा केला आहे. त्यांनी विशेष संशोधन करून आपण ” ब्रम्हास्त्र” या सॅपोनिफायरची निर्मिती केली असून कोरोनावर ते वरदान ठरू शकते असा दावा त्यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेत श्री.सोलंकी म्हणाले , ब्रम्हास्त्रच्या साथीने आता निर्भीडपणे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्री उदा: शाळा , महाविद्यालय , हॉस्पिटल वा इतर कुठेही जाता येईल .एवढेच नाही तर हे ब्रम्हास्त्र वापरणाऱ्यांच्या बाह्य सौंदर्यावर जसे की , चेहरा , केस यावर देखील प्रभावी ठरणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन पाळणे , सोशल डिस्टन्सिंग तसेच वारंवार साबणाने हात धुणे, असे प्राथमिक उपाय तर आहेच परंतु ‘ ब्रम्हास्त्र ‘ हे एक एडीबल साबणाचे सोल्युशन असून ते तुम्ही फक्त हात पाय नाही तर तुमच्या डोळ्यात , नाकात , आणि तोंडात फवारू शकतात. जर कोणी कोरोना पॉझिटीव्ह असेल तर त्या रुग्णाला ह्या ब्रम्हास्त्रची वाफ दर अर्ध्या तासाने तीन मिनीटाप्रयन्त दिल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

   आयुर्वेदिक असल्याने कुठलेच साईड इफेक्ट नाही.शंभर टक्के सुरक्षित आहे. संशोधन केलेले हे ब्रम्हास्त्र म्हणजे माझे सेवाभावी योगदान आहे , जळगावला याची पद्मालय आणि … हे वितरक असतील. या ‘ब्रम्हास्त्र ‘ चा वापर जास्तीतजास्त लोकांनी करावा असे आवाहन ही किशोरसिंग सोलंकी यांनी पत्रपरिषदेत केला .

Protected Content