नवी दिल्ली । कोरोनाच्या उपचारांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राहूल गांधी यांनी केली आहे.
राहूल गांधी यांनी १२ फेब्रुवारी रोजीच एक ट्विट करून कोरोना विषाणूचा संसर्ग हा घातक असल्याचे प्रतिपादन केले होते. सरकारने यावर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, राहूल गांधी यांनी आज पुन्हा हेच ट्विट रिट्विट करतांना सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना हा खूप मोठा धोका असून याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे उपाययोजना नव्हे. यावर तातडीने कार्यवाही न केल्यास अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त होऊ शकते. सरकार याबाबत मूर्खपणा करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
I will keep repeating this.
The #coronavirus is a huge problem. Ignoring the problem is a non solution. The Indian economy will be destroyed if strong action is not taken. The government is in a stupor. https://t.co/SuEvqMFbQd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 13, 2020