बोदवड, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातलेला असतांना बोदवड तालुका हा कोरोना मुक्त आहे. खबरदारी म्हणून आशा सेविका शहरामध्ये जनजागृती करून तपासणी मोहीम राबवीत आहेत.
बोदवड शहरात आशा सेविकांकडून जनजागृती व तपासणी करण्गयात येत आहे. यात गटप्रवर्तक लता वाघचौरे, आशा सेविका ललिता मराठे, अरुणा कराड, मंगला बिल्लोरे, संध्या सोनवणे, योगिता वाणी, सुनंदा माळी, छाया तायडे या आशा सेविका घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात तपासणी मोहीम राबवीत आहेत. योग्य ती खबरदारी घेण्याचे व प्रशासकीय नियमांचे पालन करावयाचे आवाहन ते करीत आहे. कोरोना विषाणू मुक्त बोदवड हे कोरोनामुक्त राहावं यासाठी एक पाऊल आशा सेविका उचलत असून बोदवडकरांच्या सुरक्षतेसाठी आशा सेविका मेहनत घेत आहे. आजपर्यंत शहरात पंधरा हजार नागरिकांची तपासणी झाली आहे. शहरामध्ये काही भागात आशा सेविका व गटप्रवर्तक तपासणीसाठी गेले असता काही लोक तपासणी करू देत नाही व माहीत लपवत असल्याचे आशा सेविकांकडून सांगण्यात येत आहे. तरी तपासणी मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आशा गटप्रवर्तक व आशा सेविकाकडून सांगण्यात येत आहे. शहरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून आशा सेविका मेहनत घेत असतांना दिसत आहे.