कोरोनानंतर आता नॉरोव्हायरस?

 लंडन : वृत्तसंस्था । जगभरात अद्याप कोरोनाचा धोका कायम असतानाच आता इंग्लंडमध्ये अलीकडेच नव्या विषाणूजन्य आजाराची नोंद करण्यात आली आहे. युकेमध्ये नव्या ‘नॉरोव्हायरस’ चे  अनेक  रुग्ण सापडले आहेत . 

 

फोर्टिस हॉस्पिटल वसंत कुंजच्या इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मनोज शर्मा म्हणतात कि, “नॉरोव्हायरस  अत्यंत सांसर्गिक विषाणू आहे. यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार असे त्रास उद्भवतात. या रोगाचा प्रसार फिकल-ओरल रूटमार्फत होतो. म्हणजेच, एखाद्याला दूषित अन्न, पाणी किंवा आतड्यांसंबंधी हालचाली झाल्यास त्याचा संसर्ग होऊ शकतो. डॉ. शर्मा पुढे सांगतात कि, “हा व्हायरस पृष्ठभागावरही राहू शकतो. आपण हात स्वच्छता योग्य प्रकारे राखली नाही तर त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.”

 

पावसाळ्यात नॉरोव्हायरस चिंताजनक आहे. पावसाळ्यात घरातील पाण्याची गुणवत्ता फारशी चांगली असत नाही.  पाणी दूषित असेल तर त्याचा परिणाम घरातल्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. नॉरोव्हायरसची लागण झालेली एखादी व्यक्ती स्वयंपाक करत असेल तर त्यामुळे इतरांनाही त्याची लागण होऊ शकते.”

 

फिंगर्स (बोटं), माशी (फ्लाईज), फिल्ड्स, फ्लूड (द्रवपदार्थ) आणि फूड (अन्न) यांमार्फत व मल कणांमार्फत  होणा-या संसर्गामुळे साधारणतः अतिसार, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ आणि हिपॅटायटीससारखे रोग होतात. ह्याच मार्गाने नॉरोव्हायरसचा संसर्ग होतो. त्यामुळे स्वच्छता सर्वात प्राधान्य क्रमवार असायला हवी.

 

डॉ शर्मा म्हणतात कि, “ह्यात अँटिबायोटिक्स कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत. प्रामुख्याने आपल्याला  हायड्रेटेड ठेवणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठी, ओआरएस अत्यंत उपयुक्त ठरेल. व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस प्रकारचा आजार ५ ते ६ दिवस टिकतो किंवा काही वेळा जास्त काळासाठी देखील असू शकतो. डिहायड्रेशन रोखणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”याचसोबत, नॉरोव्हायरसचा संसर्ग रोखण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे योग्य त्या प्रमाणात स्वच्छता राखणं.

 

कोरोना व्हायरस हवेतून देखील पसरू शकतो. तर नॉरोव्हायरस ऑरोफिकल मार्गाने प्रसारित होतो. डॉ. शर्मा म्हणतात कि, “आपल्या अन्नातूनच हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे दोन्ही व्हायरसच्या संसर्गापासून लांब राहायचं असल्यास एकंदर स्वच्छता आणि विशेषतः हातांची स्वच्छ राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषाणूचा संसर्गाचा मार्ग वेगळा असतो. म्हणून कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणं आवश्यक आहे.”

 

Protected Content